अहमदनगर

वेळ पडल्यास देशासाठी पुन्हा सीमेवर जाऊन लढू – माजी सैनिक शिवाजी पालवे

कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने कारगिलच्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या जिल्ह्यातील माजी सैनिकांचा सत्कार करताना फिरोदिया हायस्कुलच्या स्नेह ७५ या बॅचचे माजी विद्यार्थी.  

अहमदनगर प्रतिनिधी : १९९९ सालच्या कारगिलच्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग असल्याने आज त्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.सैनिकांचा सर्वानी आदर करणे गरजेचे असून अशा सत्कारामुळे पुन्हा नवे बळ व उभारी मिळते असे मत कारगिलच्या युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेले जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे संस्थापाक शिवाजी पालवे यांनी व्यक्त केले.

    भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुल च्या स्नेह ७५ या बॅच च्या वतीने कारगिल विजय  दिनाच्या निमित्ताने या युद्धात सहभागी असलेल्या माजी सैनिकांचा सत्कार सोहळा  सोमवारी सायंकाळी नगर मध्ये आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. या वेळी बोलताना  पालवे यांनी  देशासाठी वेळ पडल्यास पुन्हा सीमेवर जाऊन लढू असा आत्मविश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमात शिवाजी पालवे तसेच माजी सैनिक बाबासाहेब घुले,संदीप कराड,शिवाजी गर्जे,कुशल घुले यांचा स्नेह ७५ या बॅचचे माजी विद्यार्थी व  उद्योजक विश्वनाथ पोंदे,ईश्वर सुराणा,अजित चाबुकस्वार, विनोद सोळंकी,अभय गांधी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पोंदे यांनी यावेळी पालवे व इतरांच्या कार्याची ओळख करून दिली. आभार अजित चाबुकस्वार यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button