अहिल्यानगर

स्वराज्य पोलीस मित्र माहिती आधिकार पत्रकार संरक्षण समिती कडून कोरोना योध्दयांचा सन्मान

राहुरी विद्यापीठ/ जावेद शेखकोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाला आळा घालण्यासाठी शासन स्थरांवर मोठया प्रमाणात प्रयत्न होत असतानाच समाजातील घटकांनी आपापल्या परिने महामारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले या घटकांचा अनेक सामाजीक संघटनांकडून सन्मान करण्यात आला. स्वराज्य पोलीस मित्र माहिती आधिकार पत्रकार संरक्षण समितीकडून महाराष्ट्र भर कोरोना योध्दयांचा सन्मान करण्यात येत आहे.तालुक्यातील वरवंडी येथे पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय महासचिव संतोष जावळे, सचिन दिघे यांच्या प्रमुख उपस्थीतीत व उत्तर जिल्हा अध्यक्ष भरत नजन यांच्या हस्ते वरवंडी गावातील डॉ उज्वल सरकार, सरपंच भाऊसाहेब कोळेकर, प्रमोद ताकटे,आशा सेविका सौ मालती मगर, सौ कल्पना बरे, सौ संकल्या अडसुरे या कोरोना योद्धयांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माहिती आधिकार पत्रकार संरक्षण समिती जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार, जिल्हा संघटक अशोक मंडलीक, जिल्हा प्रवक्ता आर आर जाधव,प्रसिध्दी प्रमुख जावेद शेख, राजेंद्र पवार,जालींदर अडसुरे ,आबा भालेराव,अशोक बरे, मिनीनाथ आगळे, परसराम अडसुरे, बाबासाहेब भालेराव आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button