अहिल्यानगर
राहुरीच्या पत्रकारांकडुन घडनेचा निषेध
राहुरी प्रतिनिधी : पारनेर येथील पत्रकार विजय वाघमारे यांना आमच्याविरुद्ध बातम्या छापतो काय असे म्हणत वाईट शब्दात शिवीगाळ करून रिव्हॉल्व्हर व तलवारीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याने राहुरी येथील महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेकडून या घटनेचा निषेध करत गुन्हेगाराला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, राहुरी तालुकाध्यक्ष गोविंद फुणगे,शहराध्यक्ष शरद पाचारने, जिल्हा सचिव अनिल कोळसे,जिल्हा कोषाध्यक्ष संतोष जाधव,जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत जाधव,तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे,तालुका सचिव आकाश येवले,समनव्यक ऋषि राऊत यांच्या वतीने तहसीलदार फसियोद्दीन शेख व पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना निवेदन देऊन आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.