अहिल्यानगर

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या स्थानिक विकास निधीतून रस्त्याचे काम पुर्णत्वाकडे

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या स्थानिक विकास निधीतून वळण पाथरे रस्त्याचे काम पुर्णत्वास…

आरडगांव प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणारा वळण ते पाथरे रस्त्याचे काम राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या स्थानिक विकास निधीतून डांबरीकरण व मजबूतीकरणाचे काम पुर्णत्वास आले आहे.
उर्वरित पुढील रस्त्याच्या कामासाठी सुमारे ४० लाख रुपये निधी मंजूर…
    गेली १५ वर्षापासून प्रलंबित असलेला वळण ते पाथरे रस्त्याचे काम राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या स्थानिक विकास निधीतून ३४ लाख खर्चून सुमारे बाराशे मीटर डांबरीकरण व मजबूतीकरण करुन काम पुर्ण झाले असुन व उर्वरित पुढील रस्त्याच्या कामासाठी सुमारे ४० लाख रुपये निधी डांबरीकरण व मजबूतीकरण करण्यासाठी उपलब्ध झाला आहे.परिसरातील सरपंच सुरेश मकासरे,उपसरपंच एकनाथ खुळे,ज्ञानेश्वर खुळे,दत्ताभाऊ खुळे,अशोक कुलट,बी.आर. खुळे, विक्रम कार्ले, विलास आढाव,मनोज गोसावी,बाबासाहेब आढाव,प्रकाश आढाव,मुकुंदा काळे,दादासाहेब कुलट,गणेश कारले,संजय आढाव व ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त केले जात आहे.
“वळण ते पाथरे रस्त्याचे काम राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या स्थानिक विकास निधीतून डांबरीकरण व मजबूतीकरणासाठी निधी मंजूर झाल्याने शेतकरी वर्गामधुन समाधान व्यक्त केले जात आहे.”

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button