सामाजिक

कोळेवाडी गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच आरोग्य शिबीर यशस्वी – डॉ.पुनम साबळे

राहुरी प्रतिनिधी : कोळेवाडी ग्रामपंचायत सभागृह या ठिकाणी आयोजित मोफत आरोग्य शिबिर चांगल्या प्रकारे यशस्वी झाले.शिबिराची सुरुवात सहभागी तज्ञ डॉक्टर व गावचे सरपंच यांच्या वतीने वृक्ष लावून पर्यावरण सुरक्षित रहावे हा संकल्प करत उद्घाटन करण्यात आले.कोळेवाडी, म्हैसगाव, बुळे पठार, चिखलठाण, दरडगाव थडी या भागातील रुग्णांनी आरोग्य शिबिरात सहभाग घेतला.या मोफत आरोग्य शिबिरासाठी डॉ.पुनम साबळे डॉ.मनिषा कोरडे व प्रियवंदा चॅरिटेबल ट्रस्टचे केंद्र राहुरी खुर्द,येथील डॉ.अनिलकुमार दुबे, डॉ.शैलेश दुबे,डॉ.महेद्रं पवार या तज्ञ डॉक्टरांनी रक्तदाब,मधुमेह तपासणी यावर मार्गदर्शन मिळाले. तसेच सर्दी,खोकला,ताप,थंडी,उलट्या,जुलाब, सांधेदुखी ,लहान मुलांचे आजार, आदी आजारांवर तपासणी व उपचार केले.जवळजवळ ९० ते १०० रुग्णांनी मोफत आरोग्य शिबिरात तपासणी केली.आरोग्य शिबिराबाबत समाधान व्यक्त केले.
आजच्या शिबिरामध्ये सुगी फौंडेशनचे अध्यक्ष संदीप कोकाटे, अर्चना कोकाटे, संगमित्रा वस्तीग्रह राहुरी अध्यक्ष मधुकर विधाटे, आशादिप केंद्राचे चंद्रकांत त्रिभुवन, बाबा बर्डे तसेच कोळेवाडी गावातील सरपंच डॉ.जालिंदर घिगे,उपसरपंच. गंगुबाई वायळ,ग्रामपंचायत सदस्य राणी नंदकर, प्रियंका रणसिंग, सोमनाथ नवले, बबुबाई आंबेकर व गावातील आशा सेविका वंदनाताई आंबेकर, मंदाताई नंदकर तसेच सी.एस.आर.डी कॉलेजचे विद्यार्थी राहुल वायळ, सुमित निमसे,संकेत बेल्हेकर,रोहिणी कोरडे व गावातील कार्यकर्ते,तुकाराम कोरडे, सोमनाथ आंबेकर, गंगाराम कांबळे यांनी आरोग्य शिबिरात महत्त्वाचे सहकार्य केले. या सर्वांच्या सहकार्याने कोळेवाडी गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच आरोग्य शिबिर यशस्वी केले, भविष्यात तालुक्यातील दुर्गम भागात व पश्चिम भागात  वैज्ञानिक दृष्ट्या आरोग्य शिबिर करण्याचा संकल्प या शिबिरात सुगी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप कोकाटे व आशादीप केंद्राचे डॉ.दुबे यांनी व्यक्त केला आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button