अहिल्यानगर
तालुक्यातील रस्त्यांसाठी दोन कोटी निधी- राज्यमंत्री तनपुरे
राहुरी प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद मार्फत सन २०२०-२१ लेखाशिर्ष ३०३४ व २४१९ मधून रस्ते व पूल परीक्षण कार्यक्रमांतर्गत राहुरी मतदार संघातील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
राहुरी तालुक्यातील वांबोरी ते नांदगाव तालुका नगर हद्द रस्ता (ग्रामा१६६) मजबुतीकरण व खडीकरण करणे ३० लाख रुपये, वळण ते पाथरे रस्ता (ग्रामा८६) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ४० लाख रुपये, वांबोरी ब्राह्मणी रस्ता ते ससे गांधले वस्ती रस्ता(ग्रामा१५०) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ३५ लाख रुपये, पिंपरी अवघड उड्डाणपूल ते देसवंडी वस्ती रस्ता( मायनर दोनच्या कडेने)(ग्रामा१२५) खडीकरण करणे २५ लाख ,जांभळी ते बन्सी वाडी रस्ता(ग्रामा११६) खडीकरण करणे ३० लाख रुपये ,ब्राह्मणी बसस्थानक ते बहीरोबा मंदिर रस्ता (ग्रामा१३९) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ४० लाख रुपये असे एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे नामदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
पुढे बोलताना नामदार तनपुरे म्हणाले की, मतदारसंघातील बहुतांशी रस्त्यांची अवस्था बिकट झाली होती.परंतु, कोरोना आपत्तीमुळे काही विकास कामे प्रलंबित होती. ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मंजूर केल्याचे सांगितले. मतदार संघातील अनेक विकास कामांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. लवकरच प्रलंबित विकास कामांना मंजुरी मिळून विकास कामांची गोड-धोड सुरू असल्याचे नामदार तनपुरे यांनी सांगितले.सदरच्या गावातील विकास कामांमुळे तेथील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.