महाराष्ट्र
आदिवासी जोडो मोहीम राज्यात राबवा – जाधव
सिन्नर प्रतिनिधी : कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आदिवासी जोडो ही मोहीम शहरांतच नव्हेतर गांवागांवात जाऊन राबविली पाहिजे असे मत एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रेवननाथ जाधव यांनी वेक्त केले आहे. सिन्नर येथे एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रेवणनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी या विषयावर बैठक आयोजित केले होती. यावेळी महासचिव डॉ. राहुल आहिरे, राज्य संपर्क प्रमुख तुषार आहिरे, नाशिक जिल्हा संघटक चंद्रशेखर रोकडे,जिल्हाध्यक्ष अशोक नाईक,सिन्नर तालुका अध्यक्ष रामनाथ बर्डे,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार,सिन्नर तालुका कार्याध्यक्ष विजय पिंपळे,महिला प्रदेश अध्यक्ष सुषमा बोरसे,प्रदेशाध्यक्ष सुदाम तांबे,सिन्नर शहराध्यक्ष सोमनाथ पवार,अकोला कार्याध्यक्ष अध्यक्षस्थानी चंद्रशेखर रोकडे तर माधव भांगरे यांच्या प्रमुख उपस्थिती बैठक संपन्न झाली.
महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुषमा बोरसे यांनी महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवल्या पहिजेत.यावेळी कारगिलच्या युद्धात शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .