अहमदनगर
श्रीरामपूर सुवर्णकार समाजाच्या अध्यक्षपदी कुलथे यांची निवड
स्वामीराज कुलथे यांचा सत्कार करताना अध्यक्ष विजय नाना नागरे, नगरसेवक दिलीप नागरे, उमाकांत लोळगे, प्रकाश कुलथे, सोमनाथ महाले, प्रमोद लोळगे, नागेश शहाणे आदी मान्यवर.
श्रीरामपूर : येथील सुवर्णकार समाजातील तरुण तडफदार कार्यकर्ते आणि दैनिक स्नेहप्रकाशचे कार्यकारी संपादक स्वामीराज प्रकाश कुलथे यांची नुकत्याच झालेल्या सुवर्णकार समाज संघटनेच्या बैठकीत सर्वानुमते त्यांची श्रीरामपूर सुवर्णकार समाजाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
स्वामीराज कुलथे हे दैनिक स्नेह प्रकाशचे कार्यकारी संपादक असून साहित्य प्रबोधन मंचचे कार्याध्यक्ष आहेत. समाजातील तरुणांना सोबत घेऊन ते कायम समाज हिताची कामे करत असतात, त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल विजय नाना नागरे, उमाकांत लोळगे, दिलीप नागरे, सोमनाथ महाले, प्रकाश कुलथे, सचिन महाले, अमोल महाले, अनिरुद्ध महाले, संतोष चापनेरकर, नागेश शहाणे, सतीश नागरे, संजय कुलथे, प्रमोद लोळगे, संपत पोकळे, राजन माळवे, महेश माळवे, सुधीर लोळगे, नितीन चित्ते,संतोष उदावंत, सचिन मंडलिक,गणेश मुंडलीक, गजानन मुंडलीक, अजिंक्य नागरे, अक्षय नागरे, प्रणव बोऱ्हाडे, श्रीपाद बोऱ्हाडे, गणेश लोळगे, राजू नागरे, विकी मुंडलीक, दादा जगदाळे, सुहास मानिकजडे, कृष्णा उदावांत, शुभम आव्हाड यांच्यासह सर्व समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे.