अहिल्यानगर
चिमुकल्यांनी सादर केलेल्या छत्रपतींच्या जीवना वरील नाटीकेने संगमनेरकर भारावले
संगमनेर शहर : सकल मराठा समाजाच्या वतीने बस स्थानक परिसरामध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल स्ट्रॉबेरी आणि इंग्लिश मीडियम स्कूल या दोन विद्यालयाच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य कथा आणि शिवकल्याण राजा शिवछत्रपती या दोन नाटिकेने संगमनेरकर चांगलेच भारावून गेले होते.
कोविड महामारी असल्यामुळे गेली दोन वर्षे शिवजयंती उत्सव साजरा करता आला नाही. त्यामुळे यावर्षी हा सकल मराठा समाजाच्या वतीने साजरा करण्याचे ठरले. त्यानुसार शिवजयंतीच्या औचित्य साधून येथील जिजामाता इंग्लिश मेडिकल स्कुल च्या चुमुकल्यानी शौर्य गाथा छत्रपती शिवरायांची ही बहारदार नाटीका सादर करून संगमनेर करांची वाह वाह मिळविली तर स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कुलच्या चिमुकल्यानी शिवकल्याण राजा ही नाटिका सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी जय जिजाऊ, जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
त्यानुसार सर्वप्रथम शहरातून विविध अकॅडमीच्या मुले व मुली तसेच संगमनेर महाविद्यालय सह्याद्री महाविद्यालयाच्या मुले आणि मुलींची मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या मॅरेथॉन स्पर्धेला सुद्धा स्पर्धकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. मॅरेथॉन स्पर्धेत मुलींच्या गटात प्रथम क्रमांकाचे ११ हजार १११ रुपयाचे बक्षीस खुशी सोमनाथ हासे हिने तर मुलांच्या गटामध्ये संजय मारुती झाकणे याने पटकाविले, द्वितीय क्रमांकाचे ७ हजार ७७७ रुपयाचे पुनम मारुती वलवे हिने तर मुलांच्या गटात प्रसाद अशोक गव्हाणे यांने तृतीय क्रमांकाचे ५ हजार ५५५ रुपयाचे बक्षीस लता तानाजी सोनवणे हिने तसेच मुलांच्या गटा मध्ये प्रवीण सोमनाथ राऊत यांने तर मुलीच्या गटात तसेच सुवर्णा गणपत काशीद, निकिता भाऊसाहेब परासूर, अमिषा शंकर वराट तर मुलांच्या गटात ज्योतीराम बबन कालगुडे, रोशन रंगनाथ मधे, संजय उत्तम माळी या स्पर्धकांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळविली.
सर्व बक्षीस पात्र स्पर्धकांना प्रमाणपत्र सन्मान चिन्ह रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी या स्पर्धकांना मार्गदर्शन करणारे सर्व क्रीडा शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात संगमनेरकर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकल मराठा समाजातील सर्व संयोजकांनी योगदान दिले.