अहिल्यानगर
राज्यमंत्री तनपुरेंनी पाहणी करत अधिकार्यांना दिल्या सुचना
राहुरी प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव : केंदळ बुद्रुक ते उंबरे सुमारे साडेपाच किलोमीटर डांबरीकरण रस्त्याचे निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत येथील ग्रामस्थांनी सोशल मीडिया माध्यमातून माहिती व्हायरल केल्याने याची तातडीने दखल घेत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे या ठिकाणी दाखल होऊन प्रत्यक्षात पाहाणी केली. कामाची चौकशी करून रस्त्याचा दर्जा सुधारवा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सुचना केल्या आहे.याबाबत ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहे.
राहुरी तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणारा केंदळ बुद्रुक ते उंबरे रस्ता आहे. सन २०१९-२० यामधील मंजूर रस्ताचे डांबरीकरण व मजबुतीकरण साईड पट्टीवर मुरुमीकरण करण्यासाठी डंपर या रस्त्यावर गेला असता पुर्ण खचून गेल्याने येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक आघाडी तालुकाध्यक्ष विशाल तारडे,अविनाश यादव,नवनाथ कैतके,रामेश्वर तारडे,सुनील भांड,अच्युत बोरकर,सुधीर भुसे, पोपट तारडे, गणेश तारडे, शरद कैतके, बापु भुसे, सुभाष तारडे, पापट चव्हान, जनार्दन तारडे, शैलेश डोंगरे, सोमनाथ भांड, विजय चव्हाण, प्रशांत भुसे यांनी याबाबतीत सोशल मीडियावर व्हायरल केल्याने याची राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दखल घेत तातडीने या ठिकाणी दाखल होऊन प्रत्यक्षात पहाणी केली. पंचायत समितीचे शाखा अभियंता वाय. टी. कंगनकर, शिवाजी पानसरे यांना सुचना केल्या आहेत.