महाराष्ट्र
वेरूळ लेणी परिसरात वाघ दिसल्याने घबराहट
औरंगाबाद प्रतिनिधी : जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास एका नागरिकास डोंगर कपारीत वाघ दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वेरूळ, खुलताबाद, सुलीभंजन आणि म्हैसमाळ या परिसरात खळबळ उडाली,मात्र वन विभागाने या परिसरात मागील दोन वर्षांपासून बिबट्याचा वावर आहे, यामुळे व्हायरल व्हिडिओमध्ये वाघ नसून बिबट्या असू शकतो असा दावा केला आहे.तसेच पर्यटक आणि परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
मागील दोन वर्षांपासून वेरूळ, खुलताबाद सुलीभंजन आणि म्हैसमाळ परिसरात बिबट्याचा वावर आहे. व्हायरल व्हिडिओमुळे पर्यटक आणि परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. वन विभागाची पथके सतर्क असून परिसरात पाहणी करत आहेत.– अण्णासाहेब तेहरकर, वन परिक्षेत्र अधिकारी, खुलताबाद