अहिल्यानगर
‘पठारे’ मध्ये शिवजयंती उत्सव साजरा
अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी तालुक्यातील आंबी स्टोअर येथील अस्मिता रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित स्व. विठ्ठलराव पठारे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९२ वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष भागवत पठारे, रावसाहेब लाटे, संजय मुसमाडे, अशोक कर्डीले, डॉ. सुनिल खुरुद, मीरा पठारे, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, नितीन कोळसे, शरद बेहळे, माजी उपसरपंच पंकज कोळसे, योगेश कोळसे, नारायण जाधव, दत्तात्रय कोळसे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्या वतीने पत्रकार संदिप पाळंदे यांची महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या राहुरी तालुका कार्यकारिणीवर निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर पठारे, मुख्याध्यापिका पल्लवी पठारे, श्रद्धा निद्रे, सुवर्णा राऊत, पूजा मुसमाडे, सुप्रिया चव्हाण, सुरेश पठारे, दत्तात्रय पठारे, भास्कर भालसिंग, प्रतीक्षा संसारे आदींनी मेहनत घेतली.