अहिल्यानगर
स्व. प्रा. तुकाराम दरेकर यांच्या स्मरणार्थ भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन
श्रीगोंदा/ वृत्तसेवा/ सुभाष दरेकर : तालुक्यातील हिरडगाव येथे दि. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी स्व. प्रा. तुकाराम दरेकर यांच्या स्मरणार्थ भव्य एकदिवसीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे.
श्रीगोंदा तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार अशा विविध क्षेत्रांमध्ये दरेकर सरांनी उल्लेखनिय कामगिरी केली होती. त्यांच्या स्मरणार्थ हिरडगावातील तरुणांनी हे नियोजन केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नहाटा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री, आमदार बबनराव पाचपुते हे असणार आहे.
या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणाऱ्या संघाला प्रथम बक्षिस- 21000 रूपये (बाळासाहेब नहाटा), द्वितीय बक्षिस- 13000 रुपये (सिसपे मल्टीपर्पज अर्बन निधी लि.), तृतिय बक्षिस- 7000 रूपये (दादासाहेब बनकर, संपत ल. दरेकर ), चतुर्थ बक्षिस- 5000 रुपये ( अनिल दरेकर, चिमाजी दरेकर ) असे असणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन विश्वास भुजबळ मित्रमंडळ हिरडगाव, राहुल दरेकर, अक्षय दरेकर, सुनिल दरेकर, तुषार दरेकर आदींनी केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शुभम म्हस्के मो. 7517029171, महेश म्हस्के मो. 9975596796, महेश रणधिवे मो. 7757032630, साहिल पठाण मो. 9421820585, सुनिल दरेकर मो. 7558430681 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.