अहिल्यानगर
राहुरी अर्बन कडुन अडसुरेंचा सत्कार
राहुरी प्रतिनिधी - वरवंडी येथील प्रगतशील शेतकरी जगन्नाथ कुंडलिक अडसुरे यांचा मुलगा नीरज अडसुरे यांची रिझर्व्ह बँकेच्या सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल राहुरी अर्बन पतसंस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे, जगन्नाथ अडसुरे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, अशोकराव उंडे, अमोल अडसुरे, गुलाबभाई शेख, अशोकराव लांडगे, नानासाहेब पवार, संतोष लांडगे, किरण शिंदे आदी उपस्थित होते.