कृषी

गणेशवाडी येथे कृषीकन्येचे आगमन

राहुरी प्रतिनिधी : महात्मा फुले कृषी विद्यापीठा अंतर्गत नेवासा तालुक्यातील कृषी विद्यालयातील विद्यार्थिनी मेघा सुभाष दहिफळे. या विद्यार्थिनीचे ” ग्रामीण कृषी जागृकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२ “ च्या अभ्यास दौऱ्याचे नुकतेच गणेशवाडी येथे आगमन झाले.यावेळी गणेशवाडी येथील ग्रामस्थांनी तिचे स्वागत केले.या अभ्यास दौऱ्यावेळी गणेशवाडी येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक अनुभव,यांत्रिकी शेती,पारंपारिक शेती,जैविक खते कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी,माती परिक्षण,बीज प्रक्रिया इत्यादी महत्त्वाची माहिती सांगितली.
      गणेशवाडीचे सरपंच कैलासराव दरंदले,ग्रामसेवक संजय भिंगार्दे, सुभाष दहिफळे,काशिनाथ पंडित इत्यादी व इतर ग्रामस्थांनी कृषि कन्येचा सन्मान केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.अतुल दरंदले,कार्यक्रम समन्वयक प्रा.एम.आर.माने, प्रा.सि.के.गाजरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button