कृषी
कृषि कन्येचे डिग्रस येथे स्वागत
महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे येथील कृषिकन्या कु. अपूर्वा गोकुळ वामन हिच्या ग्रामीण कृषि जागृकता कार्यानुभव योजनेतंर्गत मौजे डिग्रस ता. राहुरी या गावाची निवड करण्यात आली. मौजे डिग्रस येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत एकनाथ अडसुरे यांच्या शेतावर कु. अपूर्वा वामन हिने भेट देऊन ओळख करुन घेतली. ग्रामीण कृषि जागृकता कार्यानुभव योजनेचा उद्देश तिने स्पष्ट केला व त्यांच्या शेताला भेट देऊन पिक पध्दतींची माहिती घेतली. प्रगतशील शेतकरी अडसुरे व त्यांचे सर्व कुटुंबीय या प्रसंगी उपस्थित होते. कृषि कन्या कु. अपूर्वा वामन हिस आम्ही सर्व सहकार्य करु, असे आश्वासन त्यांनी दिले. सदर कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालय, पुणे येथील ग्रामीण कृषि जागृकता कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय तरडे, डॉ. पल्लवी सुर्यवंशी आणि डॉ. सी.टी. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.