कृषी
कृषि कन्येने साधला शेतकऱ्यांशी संवाद
आरडगांव (प्रतिनिधी) : राहुरी तालुक्यातील दरडगावथडी या गावात श्रमशक्ती कृषि महाविद्यालय, मालदाड येथील विद्यार्थीनी गायञी ज्ञानदेव जाधव हिने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सुरू असलेल्या ‘ ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव २०२१-२०२२ ‘ या कार्यक्रमाला सुरूवात केली.शेतकऱ्यांशी संवाद साधून गावातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीबद्दल माहिती घेतली.
यावेळी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत माती परिक्षण, चारा व्यवस्थापन,किड व रोग व्यवस्थापन, आधुनिक सिंचन पद्धती, बदलत्या हवामानानुसार पिक पद्धती याविषयी शेतकऱ्यांशी संवाद साधला.शेतकऱ्यांना सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटाला सामोरे जाताना घ्यावयाची काळजी व लसीकरण याविषयी मार्गदर्शन केले.या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांशी विविध शास्त्रोक्त आधुनिक शेती पद्धतीविषयी संवाद साधला जाणार आहे.तसेच विविध प्रात्यक्षिके आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यानुभव कार्यक्रमांसाठी कृषीकन्येस श्रमिक उद्योग समुहाचे संस्थापक मा.श्री. साहेबराव नवले,प्राचार्य डॉ अशोक कडलग, उपप्राचार्य डॉ अरविंद हारदे सर , कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक तायडे सर, कार्यक्रम अधिकारी डॉ जयेश धांगडा व सर्व विषय तज्ञ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.