सामाजिक
पुलाच्या दुरुस्तीची क्रांतीसेनेची मागणी
राहुरी : राहुरी तालुक्यातील कोंढवड-तांदुळवाडी येथील मुळा नदीवरील पूलाचे स्टील उघडे पडलेले आहे.या पुलाच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग,राहुरी विभागीय कार्यालयास क्रांतीसेनेच्या वतीने अनेक वेळा निवेदन देण्यात आलेत.परंतु आजतागायत या कार्यालयाकडुन पत्र व्यवहारावरून कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली दिसुन येत नसल्याने अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने आज निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोंढवड-तांदुळवाडी येथील मुळा नदीवरील पुलाचे स्टील उघडे पडलेले आहे.या पुलावरून कोंढवड,शिलेगाव,तांदुळवाडी व आसपासच्या परिसरातील नागरिक, विद्यार्थी ये-जा करत असतात.या उघड्या पडलेल्या स्टीलमुळे पुलावर अपघात होण्याची शक्यता असुन या पुलाची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी,अन्यथा कार्यालयासमोर क्रांतीसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल,असा इशारा क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, कार्याध्यक्ष संदीप ओहोळ,संघटक जालिंदर शेडगे,श्री संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे,डिग्रस ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भिंगारदे,शिलेगावचे माजी सरपंच रमेश म्हसे,रत्नकांत म्हसे,सुनिल काचोळे,सुरेश देवरे,पप्पु हरिश्चंद्रे, भाऊसाहेब पवार,गंगाधर पवार, सागर पवार आदी कार्यकर्त्यांनी दिला आहे.