कृषी

शेतकऱ्यांना एकरी पंचवीस हजार रुपये व बियाणे मोफत द्या

हिंगोली : नेहमी कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर वरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने एकरी पंचवीस हजार रुपये आर्थीक मदत व रब्बी हंगामातील बी बियाणे व पिकांचा विमा कृषी  विभागामार्फत मोफत देण्यात यावा,यासंदर्भात हिंगोली जिल्हाधिकारी यांची अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या कार्यकर्त्यांनी भेट घेत मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मका,बाजरी, सोयाबीन,मुग,उडीद व इतर पिकांना मोड फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.यामुळे संपुर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने कृषीमंत्री हिंगोली दौऱ्यावर आले असताना केली होती.तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे विमा प्रतिनिधींना सुचना असतानाही पंचनामे करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.या सर्व प्रकाराने शेतकरी हवालदिल झाला आहे.यामुळे शेतकऱ्यांना तातडीने एकरी पंचवीस हजार रुपये आर्थीक मदत व रब्बी हंगामातील बी बियाणे व पिकांचा विमा कृषी विभागामार्फत मोफत देण्यात यावा,अशी मागणी क्रांतीसेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख राजीव पवनकर, जिल्हा प्रमुख राजु पाटील गौळकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष नरवाडे,चिंचोडीचे सरपंच रमेशराव करनोर,शरदराव मस्के,उपसरपंच रमेशराव राऊत, भगवानराव शिंदे,भास्कर तवले,संतोष कदम,संतोष राव मुधळ,पांडुरंग खुडे, प्रदिप मस्के, गणेश इंगळे, बालाजी इंगळे,कृष्णा इंगळे,महादेव हारण, पंजाबराव देशमुख आदींनी केली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button