अहिल्यानगर
क्रांतीसेनेच्या संगमनेर युवक तालुकाध्यक्षपदी भोर
संगमनेर प्रतिनिधी: पेमगिरी येथील बाळासाहेब भोर यांची अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या संगमनेर युवक तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.नियुक्ती पत्रावर राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांची स्वाक्षरी आहे.भोर यांना निवडीचे पत्र उत्तर नगर युवक जिल्हाध्यक्ष इंजि. युवराज सातपुते यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी संतोष लोंढे,सागर उंबरडे आदी उपस्थित होते.या निवडीचे क्रांतीसेनेच्या मार्गदर्शिका माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील, पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील, सरचिटणीस नितीनभैय्या देशमुख,शिक्षक क्रांतीसेनेचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडेपाटील व अहमदनगर जिल्हा पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.