ठळक बातम्या
नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती व अपघातग्रस्तास मदत करण्याची क्रांतीसेनेची मागणी
राहुरी : अहमदनगर मनमाड रस्ता अतिशय खराब झाला असुन या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी तसेच या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास अपघातग्रस्तास मदत करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्याकडे अखिल भारतीय क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी ई-मेल द्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,सालाबादप्रमाणे या वर्षीही अहमदनगर-मनमाड रस्ता अतिशय खराब झाला असुन या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.या खड्ड्यांमुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत.या अपघातात बर्याच वेळा अनेकांना मृत्यू, अपंगत्वही आले आहे.त्याचबरोबर दर वर्षी या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम केले जाते.परंतु रस्ता वारंवार खराब होतो,यांचे गुपित समजायला तयार नाही.तरी हा रस्ता दुरुस्ती करण्यासाठी किती वेळा निवेदने ,आंदोलने करायची ? यातुन सुटका करायची असल्यास या रस्त्यावर अपघात झाल्यास अपघाती व्यक्तीला अखिल भारतीय क्रांतीसेनेस प्राप्त पत्राच्या अर्जदाराने नमुद केल्याप्रमाणे ५ कोटी रुपये देण्यात यावे व हा निधी या रस्ता देखभाल,दुरुस्ती संबंधित सर्व व्यक्तींकडुन वसुल करुन अपघाती व्यक्तीच्या घरच्यांना देण्यात यावी.तसेच अपघात होऊच नये यासाठी या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे काम हाती घ्यावे,अशी मागणी केली आहे.