कृषी
शासकीय पातळीवर राज्यातील शेतजमिन मोजणीची पैठण तहसीलदार यांच्याकडे मागणी
पैठण : शेतकऱ्यांचा महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो जमीन मोजणीचा.या प्रश्नापायी कैक शेतकऱ्यांचे संसार उद्धवस्त झाले आहे.यामुळे अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण तहसीलदार शेळके साहेब यांच्याकडे महाराष्ट्रातील शेतजमीनीची शासकीय स्तरावर मोजणी करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी निवेदन देताना अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाचे पैठण तालुका प्रमुख लक्ष्मण शेलार,विशाल तांबे,तालुका उपाध्यक्ष गणेश औटे,युवक शहराध्यक्ष गणेश डुलगज,शहर प्रसिद्धी प्रमुख निलेश देशमुख, विद्यार्थी सरचिटणीस फारूख चिराख आदी उपस्थित होते.