अहिल्यानगर
दुध दर वाढीसाठी क्रांतीसेनेचा महादेवाला दुग्धाभिषेक
कोल्हार:अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने मागील महिन्यात दुध दर वाढ व मागील चार महिन्याचा दुध दराचा फरक देण्याची मागणी केली होती.शासनाने दुध दर वाढीबाबत आयोजित केलेल्या बैठकीत तसेच बैठकीनंतर कुठलाही ठोस निर्णय न घेतल्याने आज कोल्हार येथील क्रांतीसेनेच्या कार्यकर्त्यांनी महादेवाला दुधाचा अभिषेक घालत आंदोलन केले.
या आंदोलनात क्रांतीसेनेचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ऋषिकेश निबे,नयन खर्डे, विद्यार्थी तालुका अध्यक्ष संतोष जवक,विशाल काकडे,दिपक लबडे,राहुल काकडे,धनवटे वैष्णव,अकबर कलंदर,आकाश वाघमारे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.