अहिल्यानगर
क्रांतीसेनेच्या युवक उपाध्यक्षपदी हरिश्चंद्रे,सोशल मीडिया प्रमुखपदी वने
राहुरी: खडांबे खुर्द येथील प्रविण सुनिल हरिश्चंद्रे यांची राहुरी तालुका युवक उपाध्यक्षपदी तर ब्राम्हणी येथील सोमनाथ वने यांची राहुरी तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी राहुरी येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या बैठकीत नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकार्यांना क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर काँग्रेसच्या संगमनेर विद्यार्थी समन्वयक पदी युवराज पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी सत्कार केला.
या कार्यक्रमास उत्तर नगर जिल्हा प्रमुख नवनाथ ढगे, युवक जिल्हा उपाध्यक्ष शेखर पवार, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ऋषिकेश निबे, राहाता विद्यार्थी तालुका अध्यक्ष संतोष जवक, अमोल शिरसाठ,गणेश लोहकरे, गणेश कोकरे आदी उपस्थित होते.