अहिल्यानगर

संगमनेर येथे पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे सविधान दिन उत्साहात साजरा

राहुरी / बाळकृष्ण भोसले : संगमनेर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी माजी खा. जोगेंद्र कवाडे प्रणित पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संविधानावर प्रसिद्ध व्याख्याते बाबा खरात यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते होते. जिल्हा शैक्षणिक न्यायालयाचे सरकारी वकील रवींद्र राठोड यांनी सविधानावर उपयुक्त मार्गदर्शन करून भारतीय संविधानाचा जागर ग्रामीण भागातील गावागावात पोहोचवण्याचे आवाहन केले.

प्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष किशोर वाघमारे यांच्या संकल्पनेतून गेल्या दोन वर्षांमध्ये कोविड काळात शासकीय अधिकारी कर्मचारी व राजकीय पदाधिकारी यांनी जे उत्कृष्ट कार्य केले त्यांचा गौरव करण्यात आला. यात संगमनेर शहरातील प्रशासकीय अधिकारी, प्रांताधिकारी, डॉक्टर शशिकांत मंगलोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार डॉ. अमोल कदम, संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, संगमनेर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, संगमनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पवार साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व कर्मचाऱ्यांना आदी महत्त्वाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना भारतीय संविधानाची प्रत सन्मानचिन्ह व कोरोना योद्धा प्रमाणपत्र जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे, आदिवासी सेवक बाबा खरात, सरपंच रूपालीताई गौतम रोहम, पक्षाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर वाघमारे, ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाळंदे, राहता तालुका अध्यक्ष जॉन पाळंदे, शहराध्यक्ष विनोद गायकवाड, तालुकाध्यक्ष जालिंदर बोरुडे आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे, प्राध्यापक बाबा खरात, गटशिक्षणाधिकारी के के पवार, किशोर वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाळंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रसंगी पदाधिकारी प्रवीण भोसले, सतीश अभंग, डॉ. रवी मनतोडे, सागर वाघमारे, अशोक वैराळ, बाळासाहेब गायकवाड, सोमनाथ खरात, संजय भोसले, दत्तात्रय वाघमारे, गौतम रोहम, शांताराम पवार, विजय अडांगळे, रंजीत चव्हाण, निवृत्ती यादव, राजेंद्र गवळी, बाबासाहेब पवार, शरद भालेराव, मिलिंद मोकळ, गोरख बनसोडे, महिला तालुकाध्यक्ष अनिताताई दत्तात्रय वाघमारे, उपाध्यक्ष रामाताई पवारसह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button