अहिल्यानगर
महेश मुनोत विद्यालयात संविधान दिन साजरा
राहुरी शहर/अशोक मंडलिक : अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वांबोरी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्राचार्या सौ. निताशा चावरे मॅडम, उपप्राचार्य भिमराज आव्हाड, पर्यवेक्षिका श्रीम. आरण्य मॅडम यांनी प्रतिमापूजन केले. यावेळी विद्यालयातील अध्यापक सोनार सुनील यांनी संविधान बद्दल सखोल मार्गदर्शन केले, तसेच वराळे विजय यांनी संविधानाचे प्रकट वाचन करून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय याविषयी शपथ दिली. संविधान दिनानिमित्त विद्यालयात वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी गिरी विष्णू , वाव्हळ सर, बाळासाहेब पटारे, सुभाष होळकर, संभाजी पवार, अनिल लोहकरे, श्रीम. शुभांगी भोसले, श्रीम. शोभा सुडके, श्रीम. पुनम वाघुलकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम पालवे यांनी केले तर आभार संजय तमनर यांनी मानले.