अहिल्यानगर
उंदिरगांव येथे संविधान दिन साजरा
श्रीरामपुर/ बाबासाहेब चेडे : तालुक्यातील उंदिरगांव येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रथम सुरेश पाटील गलांडे, राजेन्द्र पाटील पाऊलबुध्दे, आरोग्य मित्र भिमराज बागुल यांनी प्रतिमा पुजन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
आरोग्य मित्र भिमराज बागुल यांनी संविधान प्रास्तविकाचे वाचन केले व सरपंच सुभाष बोधक यांनी प्रास्तविक उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी उप सरपंच रमेश पाटील गायके, ग्रा.पं. सदस्य प्रकाश पाटील ताके, बाळासाहेब निपुंगे, दिपक बोधक, रेवजी दादा भालदंड, बाळासाहेब रोकडे, राजीव गिऱ्हे, बाळासाहेब भालदंड, रमेश कावडवाले, छगन धीवर, शोएबभाई शेख आदि मान्यवर उपस्थीत होते.