अहिल्यानगर
मुख्याधिकारी म्हणून काम करताना आलेला कामाचा अनुभव मोलाचा ठरणार- आय ए एस नेहा भोसले
राहुरी शहर/अशोक मंडलिक : देवळाली नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम करत असताना आलेला आयुष्यातील पहिल्या कामाचा अनुभव हा आयुष्यभर नोकरी करीत असताना मोलाचा ठरणार असून प्रशासकीय सेवांमध्ये काम करत असताना मी या शहराला माझ्या माध्यमातून होईल ते सर्व सहकार्य करण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन देवळाली प्रवरा नगर परिषदेमध्ये प्रभारी मुख्य अधिकारी म्हणून गेली दीड महिन्यापासून ट्रेनिंग घेत असलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.
भारतीय प्रशासन सेवा ( आय ए एस ) मध्ये अधिकारी म्हणून रुजू झालेल्या व ट्रेनी अधिकारी म्हणून देवळाली प्रवरा नगर परिषदेमध्ये चाळीस दिवस मुख्य अधिकारी म्हणून काम केलेल्या अधिकारी नेहा भोसले यांची ट्रेनिंग पूर्ण झाल्यामुळे त्यांना नगर परिषदेच्या वतीने सन्मानित करण्यात येऊन पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम हे होते. तर यावेळी माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाश संसारे गटनेते सचिन ढुस मुख्य अधिकारी अजित निकत प्रशासनाधिकारी बन्शी वाळके आदींसह देवळाली नगर परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नेहा भोसले यांनी सांगितले की माझा हा नोकरीतील पहिलाच अनुभव मात्र तो लक्षात राहण्यासारखा आहे या शहरांमध्ये आल्यानंतर मला खूप शिकायला मिळाले सर्वांनी मला सहकार्याची भूमिका ठेवली. देवळाली शहर हे उत्तम शहर आहे हे या कालावधीमध्ये मला अनुभवयास मिळाले. मी जिथे अधिकारी म्हणून काम करील तेथे या नगरपालिकेस सहकार्य करण्याची माझी भूमिका राहील.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले की ग्रामीण भागाला समजून घेणाऱ्या शहरी अधिकारी भोसले मॅडम च्या रूपाने बघावयास मिळाल्या त्यांची काम करण्याची पद्धत ही अतिशय उत्तम पद्धत वाटली भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी प्रथमच देवळालीच्या मुख्य अधिकारी बणल्या आणि त्यांनी आपल्या कार्यकाळात मध्ये एक उत्तम अधिकारी कसा असावा हे दाखवून दिले त्यांची कामा प्रति असणारी तत्परता देशाचे भवितव्य उज्वल करण्यासारखी आहे अशा अधिकाऱ्यांची देशाला गरज आहे. आय ए एस अधिकारी मुख्य अधिकारी म्हणून येणार याची भीती सर्वांच्या मनामध्ये होती मात्र भोसले मॅडम यांनी ही भीती त्यांच्या सु सभवातून दूर केली त्यांनी यापुढेही वरिष्ठ अधिकारी म्हणून पालिकेस मदतीचा व सहकार्याचा हात पुढे करावा. यावेळी प्रकाश संसारे सचिन ढुस आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल गोसावी यांनी केले.