अहिल्यानगर

देवळाली प्रवरा पालिकेला मिळलेला पुरस्कार शहरवासीयांना अर्पण; सफाई कामगारांचे मोठे योगदान- नगराध्यक्ष कदम

राहुरी शहर/अशोक मंडलिक : शहराला देश पातळीवर मिळालेला पुरस्कार हा समस्त शहरवासींयाचा सन्मान आहे व या सन्मानाचे सर्व श्रेय समस्त नागरिक आहे. विशेषतः सफाई कामगारांचे यामध्ये मोठे योगदान असल्याचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी म्हटले आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेला केंद्र सरकारचा देश पातळीवरील पुरस्कार मिळाल्यानंतर हा पुरस्कार मिळण्यासाठी योगदान असणाऱ्या सर्व सफाई कामगारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी कदम बोलत होते.
यावेळी बोलतांना नगराध्यक्ष कदम म्हणाले काय पूरस्कार मिळाला हेच माहिती नव्हतं, अभिनंदनाचे फोन आल्यावर चौकशी केली. गावात काही अत्यंत हुशार मंडळी आहेत. त्यांना फार ज्यादा कळत. मिळालेले पारितोषिक हे सर्व शहरवाशीयांचे श्रेय आहे. निवडणूक जवळ आल्यावर शहरातील काही हुशार लोकांना कचरा व शहरातील उणिवा दिसू लागतात. हा पुरस्कार मिळण्यासाठी सफाई कामगारांचे सर्वात मोठे योगदान आहे. कर्मचारी बांधवांच्या कष्टाला नागरिकांनी साथ देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भूमिगत गटार योजनेचे अंमलबजावणी करून पुढील वर्षी प्रथम क्रमांक पटकवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरवाशियाच्या वतीने कुटुंब प्रमुख म्हणून पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलो. कोण टीका करतो त्याचे घेणे देणे नाही. शहरात पालिका स्थापन झाल्यापासून शहराचे नागरिक व सफाई कामगार शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करत असतात. सफाई कामगारांना घेऊन प्रथम क्रमांक पटकावनाऱ्या इंदोर शहराच्या पाहणीसाठी जाणार अशी घोषणा नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केली. यावेळी माजी उपनगर अध्यक्ष प्रकाश संसारे म्हणाले शहराचा देशपातळीवर गौरव अभिमानाची बाब. प्रथम क्रमांक पुरस्कार घेण्यासाठी पुढच्या वर्षी पुन्हा येऊ असा विश्वास नगराध्यक्ष यांनी पुरस्कार घेतांनाच व्यक्त केला.
आनंदात सहभागी करण्यासाठी एकत्रित कार्यक्रम घेत आहोत. आमच्यावर टीका करणारांना सध्या काहीच काम उरले नाही. त्यांचे टिकेने काही फरक पडत नाही. नगराध्यक्ष शहराचे कुटुंब प्रमुख आहेत.त्यांचे काही निर्णय व बोलणे कधी कठोर वाटत असले तरी ते कुटुंब म्हणजे शहराच्या हिताचे असते. या पुरस्काराची सुवर्ण अक्षरांनी नोंद झल्याचे आरोग्य विभागाचे सभापती सचिन ढुस म्हणाले. मुख्याधिकारी अजित निकत यांनी प्रास्ताविक करताना म्हटले की पुरस्काराचे खरे मानकरी सफाई कामगार आहेत. पुढच्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जेष्ठ नगरसेवक शिवाजी काका मुसमाडे, संभाजी वाळके यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रकाश संसारे, सचिन ढुस, शिवाजी मुसमाडे, सुजाता कदम, उर्मिला शेटे, संगीता चव्हाण, नंदाताई बनकर, भीमराज मुसमाडे, सचिन सरोदे, प्रभारी मुख्याधिकारी आय ए एस अधिकारी नेहा भोसले, मुख्याधिकारी अजित निकत, बन्सी वाळके, सुरेश मोटे सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. प्रकल अधिकारी सुनील गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Back to top button