अहिल्यानगर

‘शब्दगंध’ शेवगाव च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय खुली पत्रलेखन स्पर्धा

राहुरी / बाळकृष्ण भोसले : पत्र लेखनाची कला नामशेष होतं असल्याने नव्यापिढीला पत्र लेखनाची आवड लागावी यासाठी शब्दगंध साहित्यिक परिषद शेवंगाव शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थीसाठी जिल्हास्तरीय पत्र लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती शब्दगंध शेवंगाव चे अध्यक्ष हरीचंद्र नजन यांनी दिली.
इयत्ता ५ वी ते ७ वी एक गट तर ८ वी ते १० वी दुसरा गट राहणार असुन स्पर्धकांनी कोणत्याही विषयावर पोस्टकार्ड वर कोणालाही पत्र लिहून प्रा.उमेश घेवरीकर, त्रिमूर्ती एजन्सी, मार्केट यार्ड समोर, पाथर्डी रोड, शेवंगाव ता. शेवंगाव जि. अहमदनगर या पत्यावर पोस्टाने दि.२५ डिसेंबर २०२१ पर्यंत पाठवायचे आहेे. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे रु.७००/-, ५००/-, ३००/- रोख पारितोषिकासह प्रमाणपत्र व पुस्तकांचा संच भेट देण्यात येईल. तसेच उत्तेजनार्थ पाच स्पर्धकांना प्रमाणपत्र व पुस्तकं संच देण्यात येईल.
तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन शब्दगंध चे शेवंगाव तालुका अध्यक्ष हरीचंद्र नजन, सचिव सुरेश शेरे, उपाध्यक्ष विजय हुसळे, पुनम राऊत, कार्याध्यक्ष शहाराम आगळे, विद्या भडके, तुकाराम जाधव, विठ्ठल सोनवणे, राजेंद्र झरेकर, महेश लाडणे, शितल हिवाळे, प्रा.वैभव रोडी, सुनील वाघूम्बरे, शहादेव बन, रितेश गोरे, अभिजित नजन यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button