अहिल्यानगर
कोल्हार महाविद्यालयाचा तांदुळनेर येथे वनमहोत्सव संपन्न, ४०० बीयांचे केले रोपण
राहुरी / बाळकृष्ण भोसले – पद्मभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कोल्हार व राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग, वनस्पती शास्त्र विभाग, रासायनिक शास्त्र विभाग व भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ‘वन महोत्सव – २०२२’ (वृक्ष लागवड व संवर्धन) याचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाने तालुक्यातील तांदूळनेर येथील सह्याद्री देवराई खंडोबा मंदिर टेकडी परिसर येथे विविध वृक्षांचे रोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले व जवळपास ४०० बियांचे रोपण देखील करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ.हरिभाऊ आहेर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण तुपे, वनस्पतीशास्त्र विभागाच्या डॉ. अश्विनी आहेर, प्रा. शरद दिघे, प्रा. शिरसाट मॅडम, प्रा. जाधव मॅडम तसेच विभिन्न विभागातील प्राध्यापक यांनी यात सहभाग घेतला.
कार्यक्रम स्थळी वृक्षारोपण करताना तांदूळनेर व रामपूर येथील सरपंच सुधाकर मुसमाडे, उपसरपंच मुसमाडे, सुनील मुसमाडे, श्री खाटेकर प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी राजेंद्र मेहेत्रे यांनी देखील वृक्षारोपण प्रसंगी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तांदूळनेर गावातील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.