छत्रपती संभाजीनगर

एसटी कर्मचारी आंदोलनास बहुजन मुक्ति पार्टीचा पाठींबा

राज्य शासनाने वीज बिल माफ करुण वीज पुरवठा खंडीत करणे तात्काळ थांबबावे

◾बहुजन मुक्ती पार्टीची मागणी

विलास लाटे/पैठण : सध्या विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनास बहुजन मुक्ती पार्टीने पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर आधीच अतिवृष्टीने घायाळ झालेल्या शेतकऱ्यांचे महावितरणने थकीत बिल वसुलीसाठी कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित करत जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. सदर विज पुरवठा तातडीने सुरळीत करावा व अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने तहसिलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, एस.टी कर्मचारी आंदोलनास बहुजन मुक्ति पार्टीच्या वतीने जाहिर पाठींबा देण्यात आला आहे. संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील एस.टी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासुन आंदोलन सुरु केले आहे. आपल्या एस.टी कामगारांच्या मागण्या रास्त असुन त्या शासनाने तात्काळ मान्य कराव्यात. वेळ प्रसंगी बहुजन मुक्ति पार्टी सर्व ताकतीने एस.टी कामगारांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिल. तसेच शासन स्तरावर देखील आमचा पक्ष पुर्ण महाराष्ट्र राज्य पातळीवर आपल्या एस.टी कामगार संघटनेने पुकारलेल्या संपास पाठींबा देवुन त्यावर शासनाकडे दाद मागेल. संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील ३८ एसटी कामगारांनी नाविलाजाने व शासनाच्या हलगर्जीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. त्याचाही बहुजन मुक्ति पार्टीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. शासनाने या आत्महत्या केलेल्या एस.टी कामगारांच्या कुटूंबीयांना ५० लाखाची मदत तात्काळ देण्यात यावी. तसेच आत्महत्या केलेल्या एस.टी कर्मचार्‍यांच्या जागेवर घरातील एक सदस्य एस. टी. परिवहन महामंडळात कामावर घेण्यात यावा. अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

तसेच राज्य सरकारने थकीत वीज बिल माफ करुन शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन खंडीत करणे तात्काळ थांबबावे. निवडणूक काळात शेतकर्‍यांना व सामान्य नागरीकांना वीज माफीचा व वीज मोफत देण्याचा नारा देवुन आपली राजकीय पोळी भाजण्या पुरतेच आश्वासन मर्यादित राहते. परंतु सत्तेत आल्यानंतर वीज बिलासंदर्भात व वीज बिलाच्या आकारणी संदर्भात आजपर्यंत कुठलेच सरकार बोलतांनी दिसत नाही. या उलट महाराष्ट्र राज्यात जे शिवसेना,काग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस हे सरकार शेतकर्‍यांच्या व सामान्य नागरीकांच्या भावनाशी खेळ खेळत असुन शेतकर्‍यांची वीज बिल व सर्व सामान्य ग्राहकांची वीज बिल मोठ्या प्रमाणात वीज बिल आकारुन लुट करीत आहे. त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यापारी, घरगुती वीज कनेक्शन असेल, या सर्वांचे हे आघाडी सरकार हे लुट करुन दिशाभुल करत आहे. ही लुट थांबण्या करीता व एस.टी कर्मचारी कामगारांच्या व बहुजनांच्या शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी दि.२० रोजी बहुजन मुक्ति पार्टी पैठण तालुक्याच्या वतीने तहसिलदार पैठण यांना निवेदन देण्यात आले आहे. 

यावेळी जिल्हाध्यक्ष नंदु भाऊ खोतकर, जिल्हा उपाध्यक्ष सखाराम मिसाळ, तालुकाध्यक्ष नंदु गरुटे, जयहरी बांगरे, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष शिवराम काळे, मोतीलाल घुंगासे, किशोर मिसाळ, ज्ञानेश्वर जाधव, भारत ताकवाले आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button