अहिल्यानगर
मानोरीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी आढाव तर उपाध्यक्षपदी तनपुरे
आरडगांव / राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील मानोरी येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी बाजीराव बाळाजी आढाव यांची तर उपाध्यपदी नानासाहेब रंगनाथ तनपुरे यांची निवड करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आब्बास शेख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारणी निवडी बैठक पार पडली आहे. सर्वानुमते कार्यकरणी सचिवपदी पोलीस पाटील भाऊराव आढाव, उत्तमराव आढाव, सेक्रेटरी पिरखाॅभाई पठाण, सौ. मनिषा रनजित आढाव, मनोज खुळे, सुनिल पोटे, चंद्रभान आढाव, निवृत्ती आढाव, सोन्याबांपू बरबडे, बाबासाहेब शिंदे, ॲड.संजय पवार, साहेबराव तोडमल, डाॅ.अजिक्य आढाव, डाॅ.राजेंद्र पोटे, गोविंद आढाव, निवृत्त पोलीस निरीक्षक काबळे, राहुल वाकरचौरे, कल्यानी तनपुरे, लतिफ पठाण, बाबासाहेब आढाव, शिवाजी थोरात, शामराव आढाव, गोकुळदास आढाव, उत्तम खुळे, पाखरे, म्हसे, मधुकर भिंगारे, कचरू आढाव, भिमराज वाघ, संजय डोंगरे, रविंद्र आढाव, फक्कड शेख, ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड, तलाठी जाधव आदिंच्या निवडी करण्यात आल्या आहेत. नूतन पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे.
गावातील तंटे गावातच मिटुन गावाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन पण तुमच्या सहकार्याची गरज आहे असे मत नुतन महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाजीराव आढाव यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती गट नेते रवींद्र आढाव, पोपट पोटे, चंद्रभान आढाव, वसंत आढाव, बाबुराव मकासरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डाॅ.बाबासाहेब आढाव यांनी मानले.