अहिल्यानगर
हरिगांव ग्रामपंचायत समोरील रस्ता पेविंग ब्लॉक शुभारंभ
श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) – तालुक्याचे लोकप्रिय आमदार लहू कानडे यांच्या विशेष प्रयत्नातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास या योजनेतून हरेगाव येथे ग्रा.प. कार्यलया समोरील प्रमुख रत्याचे पेविंगब्लॉक रस्ता करण्याच्या कामाचा शुभारंभ झाला.
आज ह्या उदघाटनासाठी अशोकराव कानडे येणार होते. परंतु मा. आमदार डॉ. सुधीर तांबे श्रीरामपूर येथे मा. आमदार लहू कानडे यांना भेटण्यासाठी येणार असल्याने त्यानां उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे अशोकराव कानडे यांनी काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात यावे अशी सूचना केली. त्याप्रमाणे मारुती शरणगते यांच्या हस्ते शुभारंभ नारळ फोडण्यात आले.
यावेळी हरेगाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ग्रा. प.सदस्य सुनिल शिनगारे, ग्रा. प.हरेगाव उपसरपंच चेतन त्रिभुवन, माजी सरपंच दिलीप त्रिभुवन, आकाश सूर्यवंशी, विशाल गायकवाड, हेमंत शिरसाठ, उमेश गायकवाड, सुंदर बोरगे, रामदास फुलवर, संजय भालेराव, कयूम देशमुख, संदीप धनेधरं, अनु वाहुळ, शंकर जाधव, गिरीश परदेशी, सिद्धार्थ धनेधर, खरे भाऊ, आशिष शिंदे, शिंदे कॉन्ट्रॅक्टर आदी उपस्थित होते. श्री सुनिल शिनगारे यांनी हरेगाव परिसरात आमदार साहेबांनी केलेल्या कामाची माहिती दिली तसेच चेतन त्रिभुवन यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.