अहिल्यानगर

निसर्गोपचार तज्ञ डॉ.प्रविण निचत आयुष कोरोना योद्धा 2021 पुरस्कारने सन्मानित

अहमदनगर/ जावेद शेख : राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्त दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी कविवर्य सुरेश भट्ट सभागृह, रेशिमबाग, नागपूर येथे महाराजा ऑफ नागपूर श्रीमंत राजे मुधोजी भोसले, श्री. प्रवीण जोशी डेप्युटी डायरेक्टर (ई.सी. राजकोट एम एस एम ई टीडीसी पीपीडीसी आग्रा मिनिस्ट्री ऑफ एम एस सी ई गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऑर्गनायझेशन, डॉ. विनोद ढोबळे, डॉ. सतीश कराळे, डॉ. नितिन पाटील व इतर उपसथितांसमोर डॉ. प्रविण नीचत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (राष्ट्रीय उद्योग इंडिया) ह्यांना एम एस एम ई व आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे आयुष कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले.
डॉक्टर प्रविण ह्यांनी कोरोनो काळातील अनेक धाडसी कार्याची दखल घेत MSME ( मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल अँड मिडीयम एंटरप्राइजेस) आणि AIMA (आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन) तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले. कोरोना साथीच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय व अपवादात्मक कामगिरी केलेल्या कार्याबद्दल विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून सम्मानीत करण्यात आले.

Related Articles

Back to top button