अहिल्यानगर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रसाद शुगर कारखान्यावर आंदोलन

अहमदनगर/ जावेद शेख : गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने सुरू झाले आहेत. १ लाखाच्या आसपास गाळप हि पुर्ण झाले. मात्र कुठल्याही कारखान्याने एफ आर पी प्रमाणे ऊस दर जाहिर केले नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होत जिल्हाप्रमुख रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तालुक्यातील प्रसाद शुगर या कारखान्यावर पहिले काटा बंद आंदोलन हाती घेतले.
या आंदोलनात प्रकाश देठे, सतीश पवार, नितीन मोरे, आनंद वने, पोपट धुमाळ, निशिकांत सगळगिळे, प्रमोद पवार, बद्रुद्दिन इनामदार, बाळासाहेब शिंदे आदींसह शेतकरी व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी प्रसाद शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या व्यवस्थापनाचे अधिकारी ऊस दरवाढीसाठी चर्चा करण्यासाठी उपस्थित नसल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. व्यवस्थापन प्रशासनाने तातडीने दखल घेऊन लेखी आश्वासन देत येत्या तीन-चार दिवसांमध्ये प्रसाद शुगर प्रा.लि. च्या वतीने इतर कारखान्यांच्या तुलनेत एफ आर पी प्रमाणे तीनशे ते चारशे रुपये जास्तीचा दर निश्चित जाहीर करु असे आश्वासन देण्यात आले.

Related Articles

Back to top button