निधन वार्ता
पत्रकार दौलतराव झावरे पाटील यांना मातृशोक
अहमदनगर : दैनिक सकाळचे उपसंपादक दौलतराव झावरे पाटील यांच्या मातोश्री लिलावती गोविंदराव झावरे पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
त्या 70 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या त्या भाची होत. पत्रकार दौलतराव झावरे पाटील व अँड भैय्यासाहेब झावरे पाटील यांच्या त्या मातोश्री व सेवानिवृत्त शिक्षक गोविंदराव झावरे पाटील यांच्या त्या पत्नी होत.
गेल्या अनेक वर्षांपासून त्या फुप्फुसाच्या आजाराने आजारी होत्या. 2005 पासून त्यांच्यावर नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आदी ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आज शनिवारी (ता. 20) ला रात्री नऊ वाजून 31 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर नेवासा येथील अमरधाम येथे रविवारी (ता. 21) ला सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.