ठळक बातम्या

भाजपाचे खा.डॉ. सुजय विखे जिल्हा रुग्णालयातील जळीत व शिकाऊ डॉ.शिंदे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत गप्प का?

देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे : अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय नेते महाविकास आघाडी विरोधात आक्रमक भुमिका मांडणारे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आग लागून ११ जणांचा मृत्यू झाला होता. तर शिकाऊ डॉक्टर विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असताना येथिल राजकीय नेते यावेळी शांत कसे? त्यामध्ये विशेष म्हणजे नगरचे खा.डॉ.सुजय विखे वैद्यकिय क्षेञातील हे निरो सर्जन आहेत. त्यांना परीपुर्ण माहिती असणारे राजकीय नेते आहे. परंतू खा.डॉ. विखे यांनी हि शिकाऊ डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया किंवा आक्रमकता दाखविली नाही. राजकीय स्वार्थासाठी आक्रमकता दाखवणारे भाजपाचा एक हि नेता डॉ. शिंदे सारख्या सर्वसामान्य मुलीच्या मागे उभे राहण्या ऐवजी शांत कसे असा प्रश्न देवळाली प्रवरातील नागरीकांनी विचारला आहे.
जिल्हा रुग्णालयातील जळीत प्रकरणी तोफखाना पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. यात देवळाली प्रवराच्या कन्या डॉ.विशाखा शिंदे यांचाही समावेश आहे. फिर्यादी पोलिस अधिकाऱ्यांने डॉ. विशाखा शिंदे हि त्या विभागाची वैद्यकिय अधिकारी आहे, असे समजुन डॉ. शिंदे विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. परंतू आरोग्य विभागाने आपली चुक तातडीने दुरुस्त करुन निलंबन मागे घेतले. पोलिसांनी चुकीची फिर्याद दाखल करुन एका निष्पाप शिकाऊ डॉक्टरचा बळी देणाऱ्या फिर्यादी पोलिस अधिकाऱ्यांसह तपासी पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्या चौकशीची मागणी विविध संघटनांनी केली आहे. माञ भाजपाचे जिल्ह्यातील आक्रमक नेते खा.डॉ. सुजय विखे, माजी आ. शिवाजी कर्डीले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी माञ शिकाऊ डॉ. शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करताना प्रशासनाची मोठी चुक झालेली असतानाही यावेळी हे सर्व नेते शांत कसे असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.
डॉ.शिंदे या शिकाऊ डॉक्टरने नुकतेच एम बी बी एस पुर्ण करुन अस्थीरोग विभागात पदव्युत्तर पदविका करणाऱ्या शिकाऊ डॉक्टर आहेत. जळीत प्रकरणात पोलिस व प्रशासनाने कोणती शाहानिशा न करता आरोग्य विभागाने निलंबित केलेल्या सहा जणा विरोधात गुन्हा दाखल केला. परंतू या मध्ये आरोग्य विभागाने वेळीच चुकीची दुरुस्ती करुन शिकाऊ डॉक्टरचे निलंबन मागे घेतले आहे. संभाव्य होणाऱ्या आरोपातून सुटका करुन घेतली. माञ पोलिसांनी तपास करताना डॉ.शिंदे यांना न्यायालयात पोलिस कोठडी मागितली होती. पोलिस कोठडी संपताच न्यायालयीन कोठडी मागणी केली होती. परंतू पोलिसांनी माञ ती शिकाऊ डॉक्टर आहे. याबाबत न्यायालयातही खुलासा केलेला नाही.
जिल्हा रुग्णालयातील जळीत प्रकरणी जबाबदारी सहा जणाविरुद्ध टाकण्यात आली. यात माञ एका सरकारी डॉक्टरसह चार महिलांना अटक करण्यात आली.माञ जिल्हा शल्य चिकित्सक सुनिल पोखर्णा यांना माञ पोलिसांनी अटकपुर्व जामिन मिळण्यासाठी मदत केली. त्यासाठी सत्ताधारी गटातुन दबाव तंञाचा वापर करण्यात आला. डॉ.पोखर्णा जामिन मिळविण्यात यशस्वी झाले. त्यांना जामिन मिळावा यासाठी पोलिस तपास पथकानेही मदत केली असल्याची चर्चा आहे. शिकाऊ डॉक्टर विरुद्ध चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी डॉक्टर यास वाचविण्यासाठी शिकाऊ डॉक्टरचा बळी दिल्याचे जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेते बोलत आहे. पण कोणी आवाज उठवत नाही.
महाविकास आघाडीच्या विरोधात मिळालेल्या मुद्यावरुन भाजपाचे खा. डॉ.सुजय विखे, माजी आ.शिवाजी कर्डीले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे रान पेटवत असतात. तेच नेते माञ जिल्हा रुग्णालयातील जळीत प्रकरणी कोणाला तरी वाचविण्यासाठी चुकीच्या पद्धतीने तपास चालू असताना भाजपाचे नेते गप्प का? असा सवाल यानिमित्ताने पुढे केला जात आहे.
भाजपाचे खा.विखे गप्प का? पोलिस उपअधिक्षक मिटके कडून तपास काढुन घ्यावा- पगारे 
       भाजपाचे दक्षिणचे खा.डॉ. सुजय विखे जिल्हा रुग्णालयातील जळीत प्रकरणी गप्प बसण्याची भुमिका का घेतली. डॉ.पोखर्णा यांना मदत करण्यासाठी त्यांनी शांततेचे धोरण स्वीकारले आहे का? तपासी पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांचा तपास संशयाच्या भोवऱ्यात असल्याने त्यांच्या कडून तपास काढुन घेण्यात यावा अशी मागणी आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी केली आहे. शुक्रवारी दुपारी पञकार परीषद घेवून केली आहे.

Related Articles

Back to top button