अहिल्यानगर
एसटी कर्मचारी संपाला छावा क्रांतिवीर सेनेचा पाठींबा
श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : येथील एसटी कर्मचारी संपाला आज छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकार्यांनी पाठींबा दिला आहे. छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर येथे एसटी कामगारांच्या संपाला पाठिंबा देण्यात आला असल्याचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रोहित यादव यांनी सांगितले.
यावेळी उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष रोहित यादव, जिल्हा कार्याध्यक्ष किरण माकोणे, ता.अध्यक्ष विशाल जाधव, शहराध्यक्ष विनायक मुसमाडे, उपाध्यक्ष प्रशांत भोसले, राष्ट्रवादी युवक शहर सरचिटणीस सुनील म्हस्के, तेजस कडू, गणेश बोरुडे, दारा जेधे, प्रशांत थोरात, राहुल वर्मा, आदित्य चौधरी यांनी संपाच्या ठिकाणी उपस्थित राहून पाठींबा जाहीर केला. तसे निवेदन संपकरी एसटी कर्मचारी अमोल पटारे, संजय गायकवाड, गणेश पुजारी, प्रशांत लिहिणार, गजानन औटी, ज्ञानेश्वर गुजर यांना देण्यात आले. यावेळी संपावरील कामगारांनी मागण्या पूर्ण मान्य होईपर्यंत संप चालूच राहणार असल्याचे सांगितले.