अहिल्यानगर

बिबट्याने पाडला दोन शेळ्यांचा फडशा…

देवळाली प्रवरा/ राजेंद्र उंडे : येथिल आंबी रस्त्यालगत भालसिंग यांच्या वस्तीवर बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडला तर दोन शेळ्या जखमी केल्या आहेत. वन विभागाने या भागात पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे.
देवळाली प्रवरा येथिल भालसिंग वस्तीवर बुधवारी राञी 12 वाजण्यापुर्वी बिबट्याने घरासमोर बांधलेल्या शेळ्यांवर झडप घालुन दोन शेळ्यांचा फडशा पाडला. तर दोन शेळ्या जखमी झाल्या आहेत. या भागात बिबट्याचा संचार वाढला आहे. वन विभागाकडे यापुर्वीच पिंजरा लावण्याची मागणी केली परंतू वन विभागाने पिंजरा लावला नाही. उपस्थित शेतकऱ्यांनी या भागात मादी व बछडे अशा तीन चार टोळ्या आहेत असे सांगितले.
यावेळी अशोक भालसिंग यांनी सांगितले की, या भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. बुधवारी राञी बारा वाजण्याच्यापुर्वी शेळ्या ओरडण्याचा आवाज येत असल्याने घराबाहेर येवून पाहिले असता बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडला होता. तर दोन शेळ्या जखमी केल्या. वन विभागाने या भागात पिंजरा लावावा अशी मागणी भालसिंग यांच्या वतीने करण्यात आली. वनपरीक्षेञ एस. एम. गायकवाड, वनरक्षक एस. एस. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी बाबासाहेब सिनारे यांनी पंचनामा केला आहे.

Related Articles

Back to top button