अहिल्यानगर
नवीन मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी विशेष ग्रामसभा संपन्न
राहुरी शहर/अशोक मंडलिक : जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर निवडणूक शाखेच्या सूचनेवरून मतदार यादी मधील नोंदणीमध्ये नवीन मतदारांची नवीन नोंदणी करने, तसेच चुकीच्या दुरुस्त्या व नाव वगळण्याच्या प्रक्रियेसाठी राहुरी खुर्द येथील बुवासाहेब मंदिराच्या सभा मंडपामध्ये विशेष ग्रामसभा संपन्न झाली.
सदर विशेष ग्रामसभेला प्रांताधिकारी श्री जगताप, तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी मार्गदर्शन करून मतदार यादीतील दुरुस्त्या, नवीन नोंदणी व नाव वगळण्याच्या प्रक्रियेची माहिती सांगून मतदारांनी दोन ठिकाणी नावे असणाऱ्या मतदारांनी एकाच मतदार यादित नावे ठेवावीत. अन्यथा दोन ठिकाणी नावे आसणा-यांवर गुन्हे दाखल होणार असल्याचे सांगितले.
सरपंच सौ.मालती साखरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेत उपसरपंच तुकाराम बाचकर, ग्रा.पं. सदस्य राम तोडमल, असफ पठाण, शिवाजी शेंडे, निसारभाई शेख, गेणूभाऊ तोडमल, अयुबभाई पठाण, ग्रामविकास अधिकारी संभाजी निमसे, तलाठी अमोल काळे, बुधलेवल ऑफीसर राऊत सर, अशोक जगधने, गायकवाड मॅडम, नाईकवाडी मॅडम, नागरगोजे सर, गाडेकर भाऊसाहेब यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.