अहिल्यानगर

“वारसा इतिहासाचा, मराठी संस्कृतीचा” किल्ले बनवा स्पर्धेचा निकाल जाहीर

राहुरी : राहुरी फॅक्टरी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून “वारसा इतिहासाचा, मराठी संस्कृतीचा” किल्ले बनवा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये राहुरी फॅक्टरी व तालुक्यातील जवळपास 40 ते 45 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आलेला असून या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राहुरी फॅक्टरी येथील वंदे मातरम मंडळ, द्वितीय क्रमांक गौरव रणसिंग राहुरी तर तृतीय क्रमांक युवराज साळुंखे राहुरी फॅक्टरी यांनी पटकविला आहे.
या विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी लवकरच पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मनविसे शहराध्यक्ष संदेश पाटोळे यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button