अहिल्यानगर

18 नोव्हेंबर च्या तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीराचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा- सुरेशराव लांबे

राहुरी शहर/अशोक मंडलिक : महाराष्ट्रातील दिव्यांग बंधु भगिनी व बालकांचे दैवत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना. बच्चूभाऊ कडू यांच्या अथक प्रयत्नाने संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना आता दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जिल्हा रूग्णालयात न जाता तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयातच प्रमाणपत्र मिळणार असून दि.18 रोजी राहुरी येथे दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीर होणार असून या शिबीरात जास्तीत जास्त दिव्यांगांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी केले आहे.
जिल्हा रूग्णालयात अपंगांचे प्रमाणपत्रासाठी अनेक वेळा चकरा मारून सुध्दा प्रमाणपत्र मिळत नाही व येण्या-जाण्यास अपंग व्यक्तींना जिल्हा ग्रामीण रूग्णालयातील अंतर, वेळ व त्रास कमी व्हावा याकरिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी यांना तालुका निहाय शिबीर घेवून दिव्यांग बंधु भगिनींची तपासणी करून त्वरीत प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहे. दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. दिव्यांग जिल्हा रूग्णालयात जाणे गैरसोयीचे होत असल्याने तसेच अनेक वेळा त्यांना हेलपाटे मारून सुध्दा वेळेवर तपासणी होत नसल्याने प्रमाणपत्रही मिळत नाही त्यामुळे त्यांना शासकीय योजनांपासून वंचीत रहावे लागते. शासनाच्या या आदेशामुळे आता दिव्यांगांना जिल्हा रूग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही. ज्या-त्या तालुक्यातच दिव्यांगांची तपासणी होवून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 
ज्या दिव्यागांना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळालेले नाहीत अशा दिव्यागांनी दि. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता दोन पासपोर्ट साईज फोटो व रहिवाशी दाखला घेवून यावे व ज्यांचे प्रमाणपत्र ऑनलाईन झालेले नाही त्यांनी प्रमाणपत्राची सत्य प्रत, आधार कार्ड, रेशन कार्ड, दोन पासपोर्ट साईज फोटो, रहिवाशी दाखला हे घेवून राहुरी ग्रामीण रूग्णालयात जावून आपले जुने मिळालेले प्रमाणपत्र ऑनलाईन काढून शासनाच्या दिव्यांगासाठी असलेल्या विविध योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. लांबे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button