अहिल्यानगर
राहुरीत बळीराजाने साजरा केला पोळा सण उत्साह
राहुरी शहर : यंत्र युगामध्ये तांत्रिक प्रगती झाली असली तरी बैलासारखे पाळीव प्राण्याचं महत्व अद्वितीय आहे. पाळीव प्राण्यांना वर्षभर सन्मानाने वागणूक देणे हाच खरा सण-उत्सव होय.
व्हिडिओ : राहुरी शहरातील शनी चौक येथे बैलपोळ्याचा सण साजरा करताना बळीराजा…
राहुरी तालुक्यात पोळ्याच्या निमित्ताने बैलाची पुजा गावोगावी करण्यात आली. तसेच राहुरी शहरात शनी मंदीर येथे बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संदीप कोबरणे, प्रशांत वराळे, रामेश्वर रचकटे, नरसिंह वराळे, अनिल वराळे, दिनेश वराळे, किशोर वराळे, महेश वराळे, आकाश येवले यांनी बैल जोडींची पुजा केली. बळीराजा आणि बैलांचे वर्षानू वर्षांचे अतुट नातं. शेतात राबणाऱ्या या मुक्या जीवावर बळीराजा जीवापाड प्रेम करतो. घरोघरी हा सन मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली बळीराजाने हा सन तितक्याच उत्साहाने साजरा केला आहे. यंदा सोमवार दि. ६ सप्टेंबर रोजी हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.