अहिल्यानगर
बेताल वक्तव्य करणाऱ्या देशद्रोही कंगनावर गुन्हा दाखल करा -विष्णु पाडेकर
अहमदनगर/जावेद शेख : भारतीय स्वातंत्र्यबाबत बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या कंगना राणावत हिने भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक होते, खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले असे बेताल वक्तव्यामुळे व त्याची व्हिडीओ क्लिप प्रसार माध्यमामध्ये प्रसारित झाल्यामुळे भारत देशातील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी, क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या सर्व हुतात्म्यांचा अवमान केला आहे. त्या देशद्रोही कंगना रणावतवर फौजदारी गुन्हा दाखल करावा यासाठी कोपरगाव काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने युवा नेते आकाश नांगरे, शहराध्यक्ष रवींद्र साबळे, कोपरगाव काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विष्णू पाडेकर, महिला जिल्हाध्यक्ष सविता विधाते यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी युसुभाई शेख, अबूबकर मणियार, छोटूभाई पठाण, मंगल आव्हाड, सिद्दिकी शहा, बाबुराव पवार, प्रकाश दुशिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.