साहित्य व संस्कृती
		
	
	
—तिरंगा—
देवा तू मानसावर एक उपकार कर
माणसातील जात तेवढी हद्दपार कर
क्रांतिकारांचे  बलिदान ज्यांना भीक वाटते
देवा अशांना तू जगातून हद्दपार कर
वाटू दे नेत्यांना जातीनिहाय रंगीत झेंडे
मानसा प्रेम तू देशाच्या तिरंग्यावर कर
बंद कर माणसा नेत्यासाठी  डोके फोडणे 
माणसां सारखे प्रेम तु माणसावर कर
मानसा सगळ्यांची माती आणि राखचं होते 
करून सत्कर्म तू मरण सुखकर कर
          अशोकराव नांदे पाटील
————————————————
 
				


