अहिल्यानगर
छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रोहित यादव यांची निवड
श्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : छावा क्रांतिवीर सेना या संघटनेच्या उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी रोहित दिनकरराव यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे झालेल्या मेळाव्यात संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.
या मेळाव्यात नूतन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा कार्याध्यक्षपदी किरण माकोणे, श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी विशाल जाधव, उपाध्यक्षपदी प्रशांत भांड, सचिवपदी अमोल ताके, युवक जिल्हाध्यक्षपदी विशाल जोंधळे, शेतकरी जिल्हाध्यक्षपदी रवींद्र डूबे, ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आशिष कानवडे, संगमनेर तालुका अध्यक्षपदी गणेश थोरात, शेतकरी तालुकाध्यक्षपदी विशाल निघुट, उपाध्यक्षपदी संदीप यादव, श्रीरामपूर शहर अध्यक्षपदी विनायक मुसमाडे, शहर उपाध्यक्षपदी बंडू भोसले, शहर सचिवपदी तेजस कडू आदींची निवड करण्यात आली.
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, प्रख्यात क्रिकेटपटू बॉबी बकाल, राष्ट्रवादी सरचिटणीस सुनील म्हस्के आदींसह छावा संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. माउली उद्योग समूहाचे रोहित यादव यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.