अहिल्यानगर
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीच्या सहसचिवपदी कदम तर सल्लागार पदी निमसे
राहुरी विद्यापीठ /जावेद शेख : महाराष्ट्र राज्यातील एकमेव शासनमान्य शिक्षक संघटना म्हणजे शिक्षक भारती आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाच्या हक्कासाठी व शिक्षकांच्या सन्मानासाठी लढणारी संघटना म्हणून ओळख आहे. दि. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी अहमदनगर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भारतीच्या सहविचार सभेत महाराष्ट्र राज्याचे राज्य अध्यक्ष आर.बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सहविचार सभेत अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे श्री घोडेश्वरी जुनियर कॉलेज येथील दादासाहेब वसंतराव कदम यांची अहमदनगर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीच्या सहसचिव पदी निवड झाली तर मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई चे न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज येथील संतोष आप्पासाहेब निमसे यांची कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भारती सल्लागार पदी निवड झाली. या दोन्ही पदाधिकारी यांची सहविचार सभेत निवड होऊन अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष रामराव काळे, किशोर डोंगरे, सल्लागार कैलास राहणे ,महेश पाडेकर, उच्च माध्यमिक चे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, गोवर्धन रोडे, उपाध्यक्ष सचिन जासूद, मफीज इनामदार, सचिन लगड, अमोल चंदनशिवे, अमोल वरपे, विनाअनुदान विरोधी संघर्ष कमिटीचे महिला राज्याध्यक्ष रूपाली कुरुमकर, रूपाली बोरुडे, संपत वाळके, संजय भालेराव, संजय तमनर, प्रवीण मते, हर्षल खंडीझोड, श्याम जगताप, प्राचार्य डी. आर. सोनवणे, उपप्राचार्य दहातोंडे, जी.एम.,पर्यवेक्षक निमसे के.बी., घोरपडे, गडाख आर. आर., तांबे, काळे एस .के., रमेश साळवे, सुनील शिरसागर आदी पदाधिकारी व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.