अहिल्यानगर
अमृतवाहिनी प्रवरा माईची दिंडी परिक्रमा
अहमदनगर/ जावेद शेख : ह.भ.प. बाबानंद महाराज वीर यांच्या संकल्पनेतून ह.भ.प. माधव महाराज भगत यांच्या श्री हरिहर केशव गोविंद संस्थान बेलापूर, बन यांच्या अधिपत्याखाली व प्रवरा माईच्या कुशीतील सर्व भाविक भक्ताच्या सहकार्याने अमृतवाहिनी प्रवरा माईची भव्य दिंडी परिक्रमाचे शनिवारी (दि. १३) रोजी मोटार सायकल रॅलीचे प्रस्थान करण्यात आले. प्रारंभी ह.भ.प. बाबानंद महाराज वीर यांचे संत पुजन करण्यात आले.
यावेळी केशव गोविंद बन संस्थान ट्रष्टचे अध्यक्ष बाळासाहेब हरदास, माजी अध्यक्ष ज्ञानदेव भगत, बापूसाहेब पुजारी, विनय भगत, फकीरराव पुजारी, बी. एम. पुजारी, शशीकांत पुजारी, अनिल भगत, दिलीप भगत, शरद पुजारी, निलेश हरदास, किशोर भगत, प्रमोद पुजारी, रावसाहेब हरदास, सुरेशभाऊ भगत, दिपक भगत, राम पुजारी, गोरक्षनाथ सालबंदे, माऊली भगत. बबनराव जाधव, पत्रकार विश्वनाथ जाधव यांच्यासह केशव गोविंद बन पंचकोशीतील भाविक मोठया संख्येने उपस्थीत होते.