क्रीडा

राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष शेलार यांनी दिल्या खेळाडू व प्रशिक्षक यांना शुभेच्छा

श्रीगोंदा/ सुभाष दरेकर : भिंगार येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूल येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धेतून श्रीगोंदा तालुक्यातील सात खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करून या खेळाडूंची वसई-विरार या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घन:शाम आण्णा शेलार यांनी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक यांचा सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शौर्य राऊत, आर्यन गोरे, तनुष्का गोरे, ओंकार गोरे, सागर भुयार, सुमित भोसले, श्रुती आनंदकर या खेळाडूंची निवड झाली आहे.

यावेळी शेलार यांनी सांगितले की, श्रीगोंदा तालुक्यामध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्यात संजय आनंदकर सरांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या माध्यमातून स्केटिंग या खेळात खेळाडूंनी देशपातळीवर तालुक्याचा नावलौकिक वाढवावा, त्यासाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, मा. तालुकाध्यक्ष संजय आनंदकर, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष मीनलताई भिंताडे, मा. उपनगराध्यक्ष राजू गोरे तसेच अर्चनाताई गोरे, मोहनराव भिंताडे, मुकुंद सोनटक्के, विठ्ठल आनंदकर, डॉ.विक्रम भोसले, ॲड.स्वानंद राऊत, जयकुमार भुयार यांच्यासह पालक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button